बदलत्या शेतीतील संरक्षित शेती पध्द्तीचा यशस्वी पर्याय

हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती अशा विविध अडचणींचा सामना सध्या शेतीत करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे फलोत्पादन क्षेत्रात उत्पादन खर्च अधिक असल्याने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर उत्पादन, पीक संरक्षण व किमान खर्च यात मोठी कसरत करावी लागत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतीत यशस्वी होण्यासाठी पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून पुढे जाणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे संरक्षित शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सध्या अवकाळी पाऊस, अतिवृष्टी,गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांना मुकावे लागते. त्यामुळे संरक्षित शेती पध्दतीत तापमान कमी करण्यासह वातावरणातील अन्य घटकांचे नियंत्रण करण्यासाठी हरितगृह,शेडनेटगृह,प्लस्टिक टनेल, मल्चिंग पेपर या पध्द्तीचा वापर होऊ लागला आहे.  त्यामध्ये शेतकरी भाजीपाला, फुलपीके यशस्वीपणे घेणे शक्य झाले आहे.

agririse-banner
संरक्षित शेतीमध्ये सर्वांत कमी खर्चात फलोत्पादन पिके घेताना पीक संरक्षण हा महत्वाचा मुद्दा असतो.  किड-रोगांचा प्रादुर्भाव, हवामान बदलांची जोखीम कमी करण्यात या पद्धतीचे फायदे समोर आहेत. पिकाच्या आवश्यकतेप्रमाणे अनुकूल वातावरण निर्मिती केल्यामुळे संरक्षित शेती पध्द्तीचा अवलंब शेतकरी करू लागले आहेत.
पारंपरिक पध्द्तीच्या तुलनेत शेतमाल उत्पादन  व गुणवत्ता यांच्यात सुधारणा झाल्याचे परिणाम शेतकऱ्यांनी अनुभवले आहेत. पीकवाढीसाठी आवश्यक असणारी वातावरण निर्मिती करता येऊ शकते. पीक उत्पादन व गुणवत्ता यांच्यात सुधारणा होत असल्याने हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांमध्ये रुजू लागले आहे.
हरितगृहात वातावरणातील तापमान, आर्द्रता, प्रकाश आदी घटकांचा वापर गरजेनुसार केला जातो. कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाणही राखता येते. शेडनेटगृहात मुख्यतः वातावरणातील तापमान कमी केले जाते. आर्द्रता, वारा यांचेही नियंत्रण करता येते.

* संरक्षित शेतीकडे वाढतोय कल:

सध्या शेतकरी वर्ग अडचणीवर मात करताना बदलत्या शेती पद्धतीचा विचार करू लागला आहे. हे तंत्रज्ञान समजून घेणे अन किफायतशीर शेती करणे, हे संरक्षित शेतीत करताना शेतकरी यशस्वी होऊ लागले आहेत. संरक्षित शेतीच्या उभारणीसाठी तांत्रिक मार्गदर्शन, लागणारे साहित्य, येणारा खर्च, शासनाचे अनुदान, पीक रचना यांची संपूर्ण माहिती, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे, कृषी विभाग यांच्यामार्फत उपलब्ध होऊ लागले आहे. राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी या माध्यमातून प्रगती साधून अर्थकारणही उंचावले आहे.

* संरक्षित वातावरणातील शेतीचे फायदे: (Benefits of Protective Farming)

  • पीक घेताना कमीत कमी निविष्ठांचा वापर व त्यावर -नियंत्रण पिकाच्या वाढीच्या अवस्थेत योग्य सिंचन करताना पाण्याची गरजेचे मात्र कमी होऊन पाणीबचत
  • पिकांवर किडी-रोगांच्या प्रादुर्भाव तुलनेत कमी
  • शेतमालाच्या उत्पादनात गुणवत्ता सुधारण्यासह वजन, रंग व चव असल्याने बाजारात मागणीसह अधिकचा दर.
  • वातावरण बदल व कीटक यांच्यापासून संरक्षण
  • कमी पाणी व कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पन्न मिळण्याची हमी

* शासकीय यंत्रणांचा संरक्षित शेतीसाठी पुढाकार:

नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व फलोत्पादन शेती शाश्वत होण्यासाठी शासकीय यंत्रणा व कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने विविध योजना राज्यात राबविण्यात येत आहेत. फलोत्पादन क्षेत्रात बिगर हंगामी पिके घेण्यासह उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून कृषी क्षेत्राच्या माध्यमातून शाश्वत शेतीतून रोजगार निर्मिती व गुणवत्ता पूर्ण व निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन घेणे शक्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

* संरक्षित शेतीत वापरल्या जाणारी साधने व त्यांचे फायदे

१.मल्चिंग फिल्म : (Mulching Film Paper)

-मल्चिंग पेपरचा वापर केल्याने पिकाजवळ आर्द्रता कायम राहून होणारे बाष्पीभवन कमी प्रमाणात होण्यास मदत होते. यासह पिकात तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमीन कडक न होता केलेल्या लागवडीत मुळांचा विकास अधिक कार्यक्षम होतो. यामुळे पीक संरक्षण होण्यासह उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.काळा, सोनेरी व पारदर्शी अशा स्वरूपात हा पेपर उपलब्ध असतो.

२.पॉलिहाऊस फिल्म: (Polyhouse Films)
-वातावरण बदलत असताना धोके वाढत असल्याने नियंत्रित वातावरणात कमी पाणी, मर्यादित सूर्यकिरण, कमी कीटकनाशके आणि निविष्ठांचा वापर करून पिके घेणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे पॉलिहाऊस फिल्म च्या माध्यमातून शेती पिके घेताना अनेक बदल होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ असल्याचे पाहायला मिळते
बदलत्या हवामानाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत नाही.
हंगामी व बिगरहंगामी पिके वर्षभर घेता येतात.
गारपीट, अतिवृष्टी या संकटांपासून पिके वाचविता येतात. तर थेट पिकांवर पडणाऱ्या अतिनील सूर्यकिरणापासून बचाव होतो. तर रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो.परिणामी काढणीच्या अवस्थेत मिळणारे उत्पादन वाढ होण्यासह टिकवणक्षमता चांगली असते.

३.क्रॉप कव्हर: (Crop Cover)
-अलीकडील काळात भाजीपाला पिकांत ‘क्रॉप कव्हर’ तंत्राला शेतकऱ्यांकडून पसंती मिळत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून पिकांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर असते. त्या पार्श्वभूमीवर विविध पिकांमध्ये ‘क्रॉप कव्हर’चा वापर करू लागले आहेत. शेडनेटप्रमाणाचे हे क्रॉप कव्हर पिकावर लागवडीपश्चात झाकले जाते. याच्या वापरामुळे पिकाच्या आतील बाजूस वातावरण नियंत्रण तयार करणे शक्य होते.
यासह किडी-रोगांना प्रतिबंध करण्यासह पिकाचा दर्जा सुधारून शेतमालाचे  वजन वाढते. तीव्र उन्हाळ्यात ‘सनबर्न’ ही समस्या डाळिंबात जाणवते. त्यामुळे फळाची गुणवत्ता कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे दरावर परिणाम होतो. या समस्येवर मात करण्यासाठी त्यामुळे फुलोरा अवस्थेनंतर या कव्हरचा वापर फळांचे संरक्षण करण्यासाठी करतात.

४.क्रॉप सपोर्ट नेट: (Crop Net)
– क्रॉप सपोर्ट नेट म्हणजे जाळ्यासारखी रचना असते. प्रामुख्याने या नेटचा वापर वेलवर्गीय पिकांमध्ये होतो. त्यामुळे पीक वाढीच्या अवस्थेत त्याचा फायदा तर होतोच. शिवाय फवारणी करतांना त्याचे परिणाम चांगले मिळतात. यासह फळधारणा चांगली होऊन उत्पादनात वाढ करणे शक्य होते. एकदा क्रॉप नेट वापर करण्यास आल्यानंतर ३ हंगाम ती वापरता येते.

५.मल्चिंग होल मेकर: (Mulching Hole Maker)

मल्चिंग पेपर अस्तरल्यानंतर रोपांची लागवड करण्यासाठी गरजेनुसार होल पाडावे लागतात. यासाठी मल्चिंग होल मेकरचा वापर सुलभरित्या करता असल्याने त्याचा फायदा होतो आहे. ज्यांच्याकडे मजुरटंचाई आहे. त्यांना हे यंत्र वापरण्यास सुलभ व हलके आहे.या यंत्राच्या वापरातून मल्चिंग पेपरवर एकसारखे होल पाडता येतात. त्यामुळे कमी वेळात काम तर होतेच मात्र मजूर खर्च वाचतो.

६.वीड रिमोव्हर (Weed Remover)
तण काढणी हा मजुराअभावी अडचणीचा मुद्दा असतो.त्यामुळे कमी श्रमात झाड, शेत व पिकाच्या लागवडीतील तण काढण्यासाठी विड रिमोव्हरचा वापर होतो. अगदी कमी किंमत असून  कुठल्याही मातीत अन पिकात वापरण्यासाठी सोपे असते. त्यामुळे मजुरी वाचविने शक्य होते.

वरील माहितीशी आपण संतुष्ट असाल तर इतर शेतकरी बांधवासोबत हि लिंक शेअर जरून त्यांचाही फायदा करून द्यावा. तसेच आपल्याला देखील काही प्रश्न असतील तर आमच्या एक्स्पर्ट टीमशी संपर्क करून विनामुल्य माहिती मिळवू शकता : 7720050077 किंवा 7720050079 

www.agririse.com