Blog Detail

बदलत्या शेतीतील संरक्षित शेती पध्द्तीचा यशस्वी पर्याय

हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती अशा विविध अडचणींचा सामना सध्या शेतीत करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे फलोत्पादन क्षेत्रात उत्पादन खर्च अधिक असल्याने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसमोर उत्पादन, पीक संरक्षण व किमान खर्च यात मोठी कसरत करावी लागत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतीत यशस्वी होण्यासाठी पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून पुढे जाणे ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे संरक्षित शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या अवकाळी पाऊस, अतिवृष्टी,गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांना मुकावे लागते. त्यामुळे संरक्षित शेती पध्दतीत तापमान कमी करण्यासह वातावरणातील अन्य घटकांचे नियंत्रण करण्यासाठी हरितगृह,शेडनेटगृह,प्लस्टिक टनेल, मल्चिंग पेपर या पध्द्तीचा वापर होऊ लागला आहे. त्यामध्ये शेतकरी भाजीपाला, फुलपीके यशस्वीपणे घेणे शक्य झाले आहे.

* शासकीय यंत्रणांचा संरक्षित शेतीसाठी पुढाकार: नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान व फलोत्पादन शेती शाश्वत होण्यासाठी शासकीय यंत्रणा व कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने विविध योजना राज्यात राबविण्यात येत आहेत. फलोत्पादन क्षेत्रात बिगर हंगामी पिके घेण्यासह उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. ग्रामीण भागातून कृषी क्षेत्राच्या माध्यमातून शाश्वत शेतीतून रोजगार निर्मिती व गुणवत्ता पूर्ण व निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन घेणे शक्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. * संरक्षित शेतीत वापरल्या जाणारी साधने व त्यांचे फायदे १.मल्चिंग फिल्म : (Mulching Film Paper) -मल्चिंग पेपरचा वापर केल्याने पिकाजवळ आर्द्रता कायम राहून होणारे बाष्पीभवन कमी प्रमाणात होण्यास मदत होते. यासह पिकात तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. जमीन कडक न होता केलेल्या लागवडीत मुळांचा विकास अधिक कार्यक्षम होतो. यामुळे पीक संरक्षण होण्यासह उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.काळा, सोनेरी व पारदर्शी अशा स्वरूपात हा पेपर उपलब्ध असतो. २.पॉलिहाऊस फिल्म: (Polyhouse Films) -वातावरण बदलत असताना धोके वाढत असल्याने नियंत्रित वातावरणात कमी पाणी, मर्यादित सूर्यकिरण, कमी कीटकनाशके आणि निविष्ठांचा वापर करून पिके घेणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे पॉलिहाऊस फिल्म च्या माध्यमातून शेती पिके घेताना अनेक बदल होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ असल्याचे पाहायला मिळते बदलत्या हवामानाचा पिकांच्या वाढीवर परिणाम होत नाही. हंगामी व बिगरहंगामी पिके वर्षभर घेता येतात. गारपीट, अतिवृष्टी या संकटांपासून पिके वाचविता येतात. तर थेट पिकांवर पडणाऱ्या अतिनील सूर्यकिरणापासून बचाव होतो. तर रोगकिडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो.परिणामी काढणीच्या अवस्थेत मिळणारे उत्पादन वाढ होण्यासह टिकवणक्षमता चांगली असते. ३.क्रॉप कव्हर: (Crop Cover) -अलीकडील काळात भाजीपाला पिकांत ‘क्रॉप कव्हर’ तंत्राला शेतकऱ्यांकडून पसंती मिळत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात उन्हापासून पिकांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर असते. त्या पार्श्वभूमीवर विविध पिकांमध्ये ‘क्रॉप कव्हर’चा वापर करू लागले आहेत. शेडनेटप्रमाणाचे हे क्रॉप कव्हर पिकावर लागवडीपश्चात झाकले जाते. याच्या वापरामुळे पिकाच्या आतील बाजूस वातावरण नियंत्रण तयार करणे शक्य होते. यासह किडी-रोगांना प्रतिबंध करण्यासह पिकाचा दर्जा सुधारून शेतमालाचे वजन वाढते. तीव्र उन्हाळ्यात ‘सनबर्न’ ही समस्या डाळिंबात जाणवते. त्यामुळे फळाची गुणवत्ता कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे दरावर परिणाम होतो. या समस्येवर मात करण्यासाठी त्यामुळे फुलोरा अवस्थेनंतर या कव्हरचा वापर फळांचे संरक्षण करण्यासाठी करतात.

४.क्रॉप सपोर्ट नेट: (Crop Net) – क्रॉप सपोर्ट नेट म्हणजे जाळ्यासारखी रचना असते. प्रामुख्याने या नेटचा वापर वेलवर्गीय पिकांमध्ये होतो. त्यामुळे पीक वाढीच्या अवस्थेत त्याचा फायदा तर होतोच. शिवाय फवारणी करतांना त्याचे परिणाम चांगले मिळतात. यासह फळधारणा चांगली होऊन उत्पादनात वाढ करणे शक्य होते. एकदा क्रॉप नेट वापर करण्यास आल्यानंतर ३ हंगाम ती वापरता येते. ५.मल्चिंग होल मेकर: (Mulching Hole Maker) मल्चिंग पेपर अस्तरल्यानंतर रोपांची लागवड करण्यासाठी गरजेनुसार होल पाडावे लागतात. यासाठी मल्चिंग होल मेकरचा वापर सुलभरित्या करता असल्याने त्याचा फायदा होतो आहे. ज्यांच्याकडे मजुरटंचाई आहे. त्यांना हे यंत्र वापरण्यास सुलभ व हलके आहे.या यंत्राच्या वापरातून मल्चिंग पेपरवर एकसारखे होल पाडता येतात. त्यामुळे कमी वेळात काम तर होतेच मात्र मजूर खर्च वाचतो. ६.वीड रिमोव्हर (Weed Remover) तण काढणी हा मजुराअभावी अडचणीचा मुद्दा असतो.त्यामुळे कमी श्रमात झाड, शेत व पिकाच्या लागवडीतील तण काढण्यासाठी विड रिमोव्हरचा वापर होतो. अगदी कमी किंमत असून कुठल्याही मातीत अन पिकात वापरण्यासाठी सोपे असते. त्यामुळे मजुरी वाचविने शक्य होते. वरील माहितीशी आपण संतुष्ट असाल तर इतर शेतकरी बांधवासोबत हि लिंक शेअर जरून त्यांचाही फायदा करून द्यावा. तसेच आपल्याला देखील काही प्रश्न असतील तर आमच्या एक्स्पर्ट टीमशी संपर्क करून विनामुल्य माहिती मिळवू शकता : 7720050077 किंवा 7720050079 – www.agririse.com .

क्रॉप कव्हरला (Crop protection cover) शेतकऱ्यांची पसंदी : अलीकडील काळात भाजीपाला व फळ पिकांत ‘क्रॉप कव्हर’ तंत्र शेतकऱ्यांमध्ये रुजून वापर वाढू लागला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तापमान वाढ झाल्यानंतर पिकांचे संरक्षण करावे लागते. त्यामुळे उपयुक्त व फायदेशीर पर्याय म्हणून विविध पिकांमध्ये ‘क्रॉप कव्हर’चा वापर होऊ लागला आहे. शेडनेटप्रमाणाचे हे क्रॉप कव्हर पिकउत्पादनाच्या संरक्षणासाठी वरदान ठरले आहे. पिकाच्या आतील बाजूस वातावरण नियंत्रण यासह किडी-रोगांना प्रतिबंध करण्यासह पिकाचा दर्जा सुधारून शेतमालाचे वजन वाढते. तीव्र उन्हाळ्यात ‘सनबर्न’ ही समस्या डाळिंबासारख्या पिकात जाणवते. त्यामुळे फळाची गुणवत्ता कमी होण्याचा धोका असतो. त्यामुळे दरावर परिणाम होतो. या समस्येवर मात करण्यासाठी त्यामुळे फुलोरा अवस्थेनंतर या कव्हरचा वापर फळांचे संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. क्राँप कव्हरचा वापराचे फायदे (advantages of cover crop) : कलिंगड व खरबूजावर व्हायरस, तुडतुडे,मावा या रसशोसक किडींचा प्रादुर्भावावर मात करण्यासाठी फायदेशीर क्राँप गार्डचा वापर रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी वापर, त्यामुळे शेतात असलेल्या किडीची संख्या समजते व कोणत्या किडीचा प्रादुर्भाव शक्य रोप लागवडीपासून रोपांना क्राँप कव्हरचे संरक्षण असल्यामुळे सुरूवातीच्या काळात किडींचा प्रार्दुभाव नियंत्रण वेलवर्गीय पिकांची निरोगी व जोमदार वाढ होऊन पानांचा आकार मोठा होण्यासाठी मदत मल्चिंग पेपरचे फायदे (benefits of mulching in agriculture): बाष्पीभवन थांवून पाण्याची बचत बाष्पीभवन थांबविल्यामुळे जमिनीतील क्षारवरच्या भागावर येण्याचे प्रमाण कमी खतांच्या वापरात बचत होण्यासह वापर पश्चात अपव्यय कमी जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो. वार्षिक तणाच्या वाढीस प्रतिकार होतो. प्लास्टिकच्या प्रकाश परिवर्तनामुळे काही किडी-रोग प्रमाण कमी जमिनीचे तापमान वाढून निर्जंतुकीकरण होण्यास मदत आच्छादन पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरणनिर्मिती होत असल्याने कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अधिक लाभदायक सूक्ष्मजीवांची क्रिया अधिक सूत्रकृमीचे प्रमाण कमी होण्यासह पावसाच्या थेंबामुळे होणारी जमिनीची धूप होण्यास अटकाव .

February 18, 2021 No Comments By Agririse Agririse Uncategorized indian agriculture tips for 2021, marathi agri information, marathi agriculture tips, mulching film provider near me

8 Comments

  1. Stacy poe says:

    Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nam vitae neqnsectetur adipiscing elit. Nam viae neqnsectetur adipiscing elit. Nam vitae neque vitae sapien malesuada aliquet.

    1. Stacy poe says:

      Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nam vitae neque vitae sapien malesuada aliquet. In viverra dictum justo in vehicula. Fusce et massa eu ante ornare molestie. Sed vestibulum sem felis, ac elementum ligula blandit ac.

      1. Stacy poe says:

        Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nam vitae neque vitae sapien malesuada aliquet. In viverra dictum justo in vehicula. Fusce et massa eu ante ornare molestie. Sed vestibulum sem felis, ac elementum ligula blandit ac.

  2. Stacy poe says:

    Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nam vitae neque vitae sapien malesuada aliquet. In viverra dictum justo in vehicula. Fusce et massa eu ante ornare molestie. Sed vestibulum sem felis, ac elementum ligula blandit ac.

  3. Stacy poe says:

    Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nam vitae neque vitae sapien malesuada aliquet. In viverra dictum justo in vehicula. Fusce et massa eu ante ornare molestie. Sed vestibulum sem felis, ac elementum ligula blandit ac.

  4. Stacy poe says:

    Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nam vitae neque vitae sapien malesuada aliquet. In viverra dictum justo in vehicula. Fusce et massa eu ante ornare molestie. Sed vestibulum sem felis, ac elementum ligula blandit ac.

Leave a Reply